उस्‍मानाबाद - केंद्र  शासनाच्या भुमिअधिग्रहन कायद्यास विरोध करण्यासाठी जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या नविन भुमिअधिग्रहन कायद्यामुळे सर्वसामान्य शेतक-यांच्या शेतजमिनीच्या मालकीहक्कावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारचा हा कायदा शेतक-यांना देशोधडीला लावणारा असून या कायद्यामुळे या देशातील शेतकरी बेवारस होण्याची शक्यता आहे. शिवसेना जरी केंद्र शासनात असली तरी केंद्र सरकारच्या या भुमिअधिग्रहन कायद्यास शिवसेनेचा सक्त विरोध असून या कायद्यास विरोध करण्यासाठी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या या नविन भुमिअधिग्रहन कायद्यामुळे सरकार शेतक-यांची कोणतीही जमिन त्यांच्या परवानगीशिवाय ताब्यात घेवू शकते, येवढेच नव्हे तर शेतीची किंमत ठरविण्याचा अधिकार या कायद्यामुळे शेतकरी गमावून बसणार आहे. एका अर्थाने हा कायदा हुकूमशाही पध्दतीचा असून या कायद्यास शिवसेना कदापीही पाठिंबा देणार नाही किंवा या कायद्याचे समर्थनही करणार नाही. या कायद्यास विरोध करण्याचा ग्रामसभेचा अधिकारही केंद्र सरकारने काढून घेतला असून ऐंशी टक्के शेतक-यांनी विरोध केला तरी सरकारला जमिन अधिग्रहन करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा हा भुमिअधिगृहन कायदा शेतकरी विरोधी असल्यामुळे शिवसेना या कायद्यास कधीही पाठिंबा देणार नाही. 
      या कायद्यासंदर्भात वेंâद्र सरकारने सभागृहात चर्चा घडवून आणली पाहिजे, पण केंद्र  सरकारने असे न करता हा कायदा हुवूâमशाही पध्दतीने अमंलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या भुमिअधिकग्रहन कायद्यामुळे जमिनीवरील शेतक-यांची मालकीच नाहीसी होणार असून शेतक-यांचा परवानगीशिवाय या जमिनी ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला राहणार आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी असणा-या या कायद्यास शिवसेनेचा विरोध राहणार असून या पुढील काळात शेतक-यांच्या हितास बाधा आणणा-या कोणत्याही कायद्याविरुध्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कायम विरोध राहिल असे सांगून या कायद्याच्या विरोधात शिवसेना शेतक-याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. वेंâद्र सरकारने शेतक-याच्या विरोधात असणारा हा कायदा जोपर्यंत रद्द करण्यात येतनाही, तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने यापुढील काळातही अशाच पद्धतीचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी यावेळी दिला.
   याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जि. प. चे समाज कल्याण सभापती हरीष डावरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, दिलीपशाहू महाराज यांचेही भाषणे झाली. यावेळी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी तांबे यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले. आजच्या या धरणे आंदोलनासाठी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्यासह जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडणे, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज साळुंके, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, शेतकरी सेना जिल्हा संघटक मुजीब पठाण, तालुकाप्रमुख राजअहमद पठाण, दिलीप जावळे, अनिल शेंडगे,  जि.प.चे समाज कल्याण सभापती हरीष डावरे, माजी सभापती दगडू धावारे, जि.प. सदस्य सुषमा देशमुख, नगरसेवक सोमनाथ गुरव, नगरसेविका प्रेमाताई पाटील, महिला आघाडीच्या शौभा तौर यांच्यासह कमलाकर दाणे, नाना पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडके,  प्रदीप साळुंके, बाळकृष्णा घोडके - पाटील, बाळासाहेब देशमुख, गुणवंत देशमुख, अरुण देशमुख, विकास मोळवणे, विलास थोरबोले, प्रशांत साळुंके, आनंत भक्ते, प्रणिल रणखांब, लिंबराज डुकरे, खालीदभाई शेख, मधुकर सावंत, दादा कोळगे, पप्पू मुंडे, प्रशांत साळुंके, रामेश्वर शेटे, श्रीराम देशमुख, पकंज पाटील, कुणाल धोत्रीकर, सचिन बारकुल, यांच्यासह   शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top