उस्मानाबाद - येथाल जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत  उत्कृष्ठ कार्य केल्याबदल  वैद्यकीय  अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेवी सेवकांचा जिल्हा परीषदेचे अध्यक्ष अॅड धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमन रावत यांच्या प्रमुख उपस्थित ‍जिल्हास्तरीय वितरण पुरस्कार सोहळा पार पडला.
    यावेळी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी  पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेची  माहिती दिली. यावेळी 2014-15 या वर्षात उत्कृष्ठ आरोग्य सेवा पुरविणाऱ्या  अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. सन 2013-14 वर्षात उत्कृष्ट कार्य करणा-या गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना स्मृतीचिंन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवंराच्या हस्ते गौरविण्यात आले. यात जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट, जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण व तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. स्वयंसेवीकांची निवड  पुरस्कारासाठी करण्यात आली. सर्वोत्कृष्ठ  गट प्रवर्तक  पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.
  यावेळी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष अॅड पाटील म्हणाले की, गोरगरीब गरजु  ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्याच्या  सेवा प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचा-याची परीश्रम करण्याची गरज प्रतिपादन केली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रावत व उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती सुवर्णा कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गाडेकर एन. के. मोरे, सांख्यिकि अधिकारी जीवन कुलकर्णी, जिल्हा लेखा व्यवस्थापक एस. बी. कवडे उप अभियंता तांदळे किशोर,  लाकाळ ए. यु. जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सतीष गिरी, जिल्हा समुह संघटक के. डी.  गवळी, रुग्ण कल्याण आदिंनी परीश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. कुलदिप मिटकरी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी केले. 

 
Top