बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  जागतिक महिला दिनानिमित्त पेशवा युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या महिला भजन स्पर्धेत समर्थ, हनुमान, वरदायिनी, जनाबाई आणि ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
  गाडेगाव रस्त्यावरील श्री गणेश मंदिर येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. १६ भजनी मंडळाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्वेता पाठक, माजी नगरसेविका विजयश्री पाटील उपस्थित होत्या. सौ.पाठक म्हणाल्या, भजनातून मिळणार्‍या सुखाची तुलना कशाबरोबर करता येत नाही. भक्तीमध्ये समरस होण्यासाठी भजनाचे चांगले माध्यम म्हणून वापरता येते. सौ.पाटील म्हणाल्या, भजन ही परंपरा, साधना आहे. भजन हे सेवाभक्तीतून सामाजिक संदेश पोहोचविण्याचे प्रभावी साधनही आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.

 
Top