उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्या दि. 2 ते 4 मार्च, 2015 या कालावधीत सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर, उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2015 या ग्रंथप्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा समारोप ‘मी आमदार बोलतोय…’ या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या दिलखुलास संवादाने दि. 4 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृह आनंदनगर येथे हा कार्यक्रम सुरु आहे. दोन दिवसांत विविध साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी आणि पुस्तक खरेदीचा आनंद उस्मानाबादकर रसिकांनी घेतला आहे. उद्या, दि 4 मार्च हा ग्रंथोत्सवाचा अखेरचा दिवस असून रसिकांनी त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करावीत. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन रसिक वाचकांसाठी खुले राहणार असून जिल्ह्यातील रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने करण्यात आले आहे.  
दि. 4 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा राजकारणापलीकडचे व्यक्तीमत्व उलगडणारा दिलखुलास संवाद कार्यक्रम होणार आहे. यात ज्येष्ठ आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह औरंगाबाद शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.                          

 
Top