बार्शी : -  भा.ज.पा.नेते राजेंद्र मिरगणे यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगारांच्या हितासाठी अविश्रांत परिश्रमघेत तन-मन-धनाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यामुळे याचिकाकर्ते विश्‍वास पाटील, शिवाजी संकपाळ, धनेश जाधव, सुनिल पाटील, चांगदेव पौळ, अजितकुमार देशपांडे, यांच्या कष्टाला यश आले. आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.अनिल दवे व न्या.अमिताव रॉय यांच्या पिठाने अखेर या कारखान्याची विक्रीप्रक्रीया रद्द करत राजेंद्र मिरगणे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय मंडळाला हिरवा कंदील देत सर्वाधिकार दिले आहेत. या आगोदर हा कारखाना खरेदी केलेल्या श्री दत्त प्रा.लि.कंपनीला त्यांनी शिखर बँकेंला दिलेले ८ कोटी ७१ लाख रु. परत करण्याचा आदेश दिला.
मिरगणे यांनी न्यायालयात दिलेला प्रस्ताव दाखल करुन घेत १५० एकर जमीन विकून व कारखाना लिजवर चालवून शिखर बँकेचे कर्ज २६ कोट रुपये व विक्रकर विभागाचे ८ कोटी ७१ लाख रुपये देणे व कामगारांचे थकीत वेतन भविष्यनिर्वाह निधीचे २.५० कोट रुपये व बँक ऑफ इंडियाचे व बँक ऑफ महाराष्ट्राचे मिळून २५ कोट रुपये उर्वरित सर्व देणे व इतर देणी द्यावीत असे म्हटले आहे. हा निर्णय शेतकरी व कामगारांच्या हितासाठी महत्त्वाचा आहे. या आगोदर हा कारखाना केवळ ३३.७५ कोट रुपयांना विकला जाणार होता. तसेच सर्व कोट्यावधी रुपयांची देणी सभासदांच्या डोक्यावर कर्ज म्हणून राहणार होती.

 
Top