पांगरी  (गणेश गोडसे) जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश पाठलाग करत मागे येते, त्यासाठी मनात फक्त उर्मी असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवलेले चक्रधर ताकभाते यांनी केले. ते पांगरी (ता.बार्शी) येथील हनुमान मंदिरात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विविध गुणवंतांचा सत्कार व विभागीय संभाजी ब्रिगेडच्या  पदाधिकारी निवड मेळाव्यात बोलत होते.
     अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रा.किरण गाढवे होते. यावेळी पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ,पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड,नूतन पोलिस उपनिरीक्षक कु.जरीना बागवान,सरपंच विजय गोडसे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशिद,जिल्हा उद्योग कक्षाचे अध्यक्ष संभाजी घाडगे,खंडू डोईफोडे,विनोद धावणे,बालाजी डोईफोडे,सुहास कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.बेकार,बेरोजगार तरुणांना एका छताखाली आणून त्यांना योग्य मार्गावर घेऊन जाण्याचा संभाजी ब्रिगेडचा उपक्रम स्तुत्य असल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी यावेळी सांगितले.संभाजी ब्रिगेडबद्दल समाजात गैरसमज असून हे गैरसमज दूर करून बहुजन समाजातील तरुणाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशिल राहू असे संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशिद यांनी केले. यावेळी पांगरी विभागप्रमुखपदी सागर गोडसे,पांगरी गणप्रमुखपदी राम बसाटे(घारी) कारी गणप्रमुखपदी उमेश खंडागळे यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली.यावेळी सोमनाथ खोडवे,मनोहर पाटील,राहुल चित्राव,सुरेश शिंदे,राहुल गोडसे,विजयकुमार शिंदे,अजित गोडसे राजेंद्र नाईकवाडी,उमेश गाढवे,जयराम सुतार,दादा गोडसे यांच्यासह कारी,घारी,ऊककडगाव,चिंचोली,खामगाव,जामगाव,कुसळंब आदि तिस गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धंनजय तौर,अभिजीत गोडसे,आकाश सरडे,विश्वास काकडे,न्यानू कदम,किशोर सरडे,समाधान गोडसे,अजित वासकर,श्रीराम काकडे,पसू गोडसे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार गणेश गोडसे यांनी मानले.

 
Top