उस्मानाबाद - सध्याच्या आवकाळी पावसामुळे फळपीकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढल्याने नुकसान टाळण्यासाठी योग्य मात्रेत औषधांची फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ज्या शेतक-यांची पीके काढणीस आली असतील त्यांनी पावसाची उघडीप मिळताच पिके काढावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. 
अचानक आलेल्या पावसाने शेतक-यांची धांदल उडाली. मात्र, 3 ते 7 मार्च दरम्यान पाउस उघडीप देण्याचा अंदाज कृषी हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर पुन्हा 8 ते 12 मार्च या कालावधीत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची कामे 3 ते 7 मार्च या कालावधीत उरकून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top