बार्शी :- नारी ता. बार्शी येथील आरोपी शिवाजी गायकवाड याने 19 फेब्रुवारी 2014 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. आरोपीने सदर मुलीस ज्वारीचे शेतामध्ये नेऊन बलात्कार केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पांगरी पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणाची चोकशी होऊन आरोपीस सबल पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करणेचा आदेश बार्शी येथील सत्र न्यायाधीश मा. विकास कुलकर्णी यांनी दिले. कोर्टामध्ये आरोपीतर्फे शिवाजी क्षीरसागर वकिलांनी काम पहिले.

 
Top