नळदुर्ग  -  छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्‍वर महाराज, वीर महाराणा प्रताप या थोर महापुरूषांच्‍या जयंतीनिमित्‍त नळदुर्ग येथे भव्‍य मोटारसायकल रॅली काढून महापुरुषांच्‍या प्रतिमेची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. या रॅलीत दुचाकी, तिनचाकी वाहनांचा समावेश होता. तर रॅलीपुढे ज्‍योत घेऊन उत्‍साहाने मार्गस्‍थ होताना कार्यकर्ते दिसत होते. 
  नळदुर्ग शहरामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्‍वर महाराज, वीर महाराणा प्रताप या थोर महापुरुषांची एकत्रीतरित्‍या भव्‍य जयंती उत्‍सव साजरी करण्‍यात येते. रविवार रोजी दुपारी तीन वाजता महापुरुषांच्‍या जयंतीनिमित्‍त शहरातून भव्‍य रॅली काढण्‍यात आली. या रॅलीमध्‍ये भगवा ध्‍वज वाहनावर लावण्‍यात आला होता. ही रॅली व्‍यंकटेशनगरमधून प्रारंभ होऊन बालाघाट महाविद्यालयाच्‍या प्रागंणात हुतात्‍मा बाबुराव बोरगावकर, हुतात्‍मा निलय्या स्‍वामी यांच्‍या पुतळ्याजवळ ज्‍योत नेऊन श्रीफळ वाढून हुतात्‍म्‍यांना अभिवादन करण्‍यात आले. ही रॅली महामार्ग रस्‍त्‍याने इंदिरानगर, रामलिलानगर, व्‍यासनगर, एस.टी. बसस्‍थानक मार्गे भवानीनगर, शास्‍त्री चौक, ब्राह्मण गल्‍ली, संभाजी चौक, शिवाजी चौक, ऐतिहासिक किल्‍ला गेट, मुख्‍य बाजार पेठे‍तून क्रांती चौक, हुतात्‍मा चौक मार्गे भवानी चौकात या रॅलीचे विसर्जन करण्‍यात आले. तत्‍पूर्वी महापुरुषांच्‍या प्रतिमेची प्रतिष्‍ठापना प्रभारी नगराध्‍यक्षा सौ. सुप्रिया पुराणिक, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक जगदाळे, लहुजी शक्‍ती सेनेचे प्रदेशाध्‍यक्ष सोमनाथ कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विधाते या प्रमुख मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधून सामाजिक कार्यकर्त्‍या सौ. संगिता गायकवाड, कल्‍पना गायकवाड यांचा शिवबसवराणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी महापुरुषांबद्दल सविस्‍तर माहिती अनेकांनी आपल्‍या मनोगतातून दिले.
भव्‍य मोटारसायकल रॅलीमध्‍ये  जवळपास पाचशे युवक आपल्‍या वाहनासह सहभागी झाले होते. या रॅलीवर ब्राह्मण गल्‍ली येथे घरावरुन पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली. तर रॅलीच्‍या आगमनापूर्वी येथील रस्‍त्‍यावर फुले अंथरण्‍यात आली होती. रॅलीच्‍या समारोपप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख कमलाकर चव्‍हाण, तालुकाउपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, कॉंग्रेसचे नगरसेवक नितीन कासार, राष्‍ट्रवादीचे नगरसेवक संजय बताले, अमृत पुदाले, शरद बागल, सुधीर हजारे, ज्ञानेश्‍वर घोडके, पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, विनायक अहंकारी, शिवाजी गायकवाड यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विनायक अहंकारी  तर आभार जन्‍मोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष संतोष पुदाले यांनी मानले. 
शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीचे उपाध्‍यक्ष प्रविण चव्‍हाण, इंद्रजित ठाकूर, कोषाध्‍यक्ष ज्‍योतिबा येडगे, श्रमिक पोतदार, सचिव उमेश जाधव, विनिल जांभळे, सहसचिव सुरज कसेकर, अजय गायकवाड, अमित शेंडगे, अमित पाटील, शंतनू डुकरे, सुनील गव्‍हाणे, मारुती घोडके, रणजित डुकरे यांनी परिश्रम घेतले.

 
Top