उस्‍मानाबाद  - वडगांव ता. उस्‍मानाबाद येथील रहिवाशी व नोकरीसाठी अमेरीकेतील ह्युस्‍टन येथे असलेले संतोष महेश कोरडे, (वय 36) याचे कर्क रोगाने पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्‍यांच्‍या पार्थिवावर वडगांव येथील लिंगायत स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. याप्रसंगी समाजातील नागरिक उपस्थित होते. त्‍यांच्‍या मागे पत्‍नी, एक मुलगा, दोन भाऊ, आई वडील, तीन चुलते असा मोठा परिवार आहे. निवृत्‍त नायब तहसिलदार सुरेश कोरडे, रमेश कोरडे हे त्‍यांचे चुलते होत.  

 
Top