उस्‍मानाबाद -: भाजपाचे महाराष्‍ट्र प्रदेश सदस्‍य अॅड. मिलींद पाटील यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त शनिवार दि. 21 मार्च रोजी उस्‍मानाबादेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
अॅड मिलींद पाटील यांनी उस्‍मानाबाद शहरातील स्‍वआधार मतिमंद शाळेतील मुलीसोबत दुपारी 1 वाजता केक कापून, तसेच गुडीपाढव्‍याचे साखराचे हार व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भिमा जाधव व अनिल मंजुळे यांनी केले होते. भाजपाचे उस्‍मानाबाद शहराध्‍यक्ष भिमा जाधव व अनिल मंजुळे यांनी अॅड. पाटील यांना शुभेच्‍छा दिल्‍या.
   यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्‍य संजय निंबाळकर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, डॉ. गोविंद कोकाटे, राजाभाऊ बागल, लक्ष्‍मण माने, विजय धोत्रे, जयसिंग मोटे, गणेश घोडके, राम पाटील, नरेन वाघमारे व इतर भाजपा कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

 
Top