बार्शी -  तालुक्यातील पिंपरी (आर) येथे दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग केल्याची फिर्याद मुलीच्या आजोबांनी वैराग पोलिसांत दाखल केली आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान बालाजी महादेव पाटील (वय २८) रा.पिंपरी याने अल्पवयीन मुलीबरोबर लज्जास्पद वर्तन करुन विनयभंग केल्याचा गुन्हा वैराग पोलिसात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे हे करीत आहेत.

 
Top