बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार्‍या शिवकार्य पुरस्कारासाठी संतोष ठोंबरे ( अध्यक्ष मातृभूमि प्रतिष्ठान ), माधवराव देशमुख ( सचिव एकवीराई ग्रुप) आणि धीरज शेळके (अध्यक्ष क्रांति बहुउद्देशीय संस्था,बेलगांव,तालुका.बार्शी) यांची निवड केल्याची माहिती अध्यक्ष विजय राऊत यांनी दिली.
 हा पुरस्कार वितरण सोहळा २ मार्च रोजी संत तुकाराम सभागृहात आयोजित केला आहे. समाजाच्या गरजेनुसार प्रत्येक कार्य शिवकार्य समजून करणार्‍या व्यक्तिंचा जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिवकार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शिवजयंती निम्मित आणि जय शिवराय प्रतिष्ठानचा ३रा वर्धापन दिन आणि शिवकार्य पुरस्कार वितरण समारंभानिमित्त शिवकार्य पुरस्कार विजेते रवि ङ्गौंडेशनचे अध्यक्ष व मार्गदर्शक मधुकरजी डोईफोडे (सर) यांचे छत्रपति शिवरायांच्या आदर्श विचारतून कृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असेही यावेळी सांगण्यात आले.

 
Top