उस्मानाबाद - जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. व्ही. एस. बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निजी कक्षात पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची व जिल्हास्तरीय सोनोग्राफी केंद्र तपासणी समितीची बैठक घेण्यात आली. या बेठकीत जे सोनोग्राफी केंद्र विहीत नमुन्यात नोंदवह्या व रेकॉर्ड ठेवण्याच्या कामात कुचराई व दिरंगाई करतील, अशा केंद्राचे रेकॉर्ड जप्त करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबरे यांनी या बैठकीत दिले.    
या बैठकीस समितीचे पदाधिकारी वैद्यकीय अधिक्षक आर. पी. वाघमारे, सरकारी वकील अॅड. विजय शिंदे,  डॉ. स्मीता शहापूरकर, रमेश दाबके, डॉ. सचिन रामढवे समितीचे पदाधिकारी, वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी अॅड. उमा गंगणे यांनी सोनोग्राफी केंद्राबाबतचा बैठकीत अहवाल सादर केला. या बैठकीत नवीन सेनोग्राफी केंद्रासाठी दोन प्रस्ताव प्राप्त झाले त्यापैकी एका सोनोग्राफीस केंद्रास समितीसने या बैठकीत  मान्यता दिली. तसेच हॉस्पीटलचे प्रस्ताव, नुतनीकरण, नवीन सेंटर टुडीईको सेंटरसाठी समितीकडे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.           
जिल्हास्तरीय सोनोग्राफी केंद्र तपासणी पथकामार्फत माहे फेब्रुवारी  ते मार्च 2015या कालावधीत जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात आली. या पथकास तपासणीच्यावेळी कांही सोनोग्राफी केंद्रात अदयावत रेकॉर्ड न ठेवलेल्या केंद्राना नोटीस बजावण्यात आल्या. त्यांचेकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले. त्याबाबत या बैठकीत  सखोल चर्चा करण्यात आली.

 
Top