जळकोट (संजय रेणुके) महाराष्‍ट्र एस.टी. (स्‍टेट स्‍ट्रान्‍सपोर्ट) कामगार सेनेच्‍या तुळजापूर आगाराच्‍या कार्यकारणीची  निवड करण्‍यात आली असून सचिवपदी जळकोट ता. तुळजापूर येथील चालक परमेश्‍वर राजमाने तर अध्‍यक्षपदी सुधीर कदम यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. 
     तुळजापूर येथे महाराष्‍ट्र एस.टी. कामगार सेनेचे राज्‍य सरचिटणीस सुनिल गणाचार्य यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठकीत बिनविरोध कार्यकारणीची निवड झाल्‍याची घेषणा करून संबंधित नूतन पदाधिका-यांना निवडीची पत्रे देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. सदर कार्यकारणीतील पदाधिकारी कार्याध्‍यक्ष जे.बी. संकपाळ, उपाध्‍यक्ष श्रीमती छाया इंबळे, सहसचिव रविंद्र लिंबाजी गायक
वाड आदींची निवड करण्‍यात आली. याप्रसंगी राज्‍य सचिव प्रकाश आवस्‍थी, सोलापूर विभागीय सचिव शशीकांत झुंजार, उस्‍मानाबाद विभागीय माजी सचिव वामन जाधव, विभागीय सचिव चंद्रशेखर नाटेकरी, पी.एस. पवार, आर. एस. जाधव, ए.एन मेंढेकर, दत्‍तत्रय रोकडे, किशोर पावार, एन.व्‍ही मुळे, बी.व्‍ही. कुंभार, के.एस. गावडे, जे.बी. रणदिवे, बापू मुंडे, आदीसह  पदाधिकारी व स्‍थानिक कामगार उपस्थित होते.

 
Top