उस्‍मानाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शहरातील निष्ठावंत शिवसैनिक पप्पू मुंडे यांची आज शिवसेनेचे धाराशिव शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. 
      शिवसेनेचे उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या नियुक्तीचे पत्र मुंडे यांना संभाजीनगर येथे
प्रदान करण्यात आले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उस्‍मानाबाद शहरप्रमुखपदी शहरातील निष्ठावंत शिवसैनिक पप्पू मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र त्यांना आज संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, दिलीप शाळू महाराज, धाराशिव तालुकाप्रमुख दिलीप जावळे, भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, तुळजापूर तालुकाप्रमुख राजअहमद पठाण, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, विलास थोरबोले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top