बार्शी - शहरातील खाजगी रुग्णालयांमधील सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्र यांची तपासणी करण्यासाठी तहसिलदार व ग्रामीण रुग्णालय अधिक्षीका यांच्या पथकाने अचानकपणे रुग्णालयांना भेट देऊन तपासणी केली असून काही त्रुटी आढळून आल्या आहेत.
    शहरातील बस स्थानक चौकात डॉ.विजयसिंह भातलवंडे यांच्या व कुर्डूवाडी रस्त्यावरील डॉ.धनंजय देशपांडे यांच्या खाजगी रुग्णालयास पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. यावेळी भातलवंडे यांच्या रुग्णालयात रुग्णालय असा बोर्ड होता पण प्रत्यक्षात फक्त लहान मुलांसाठी तपासणी रुम होती व स्वच्छतेसाठी बकेट नसल्याचे आढळून आले. डॉ.देशपांडे यांच्याकडे याबाबत काही त्रुटी आढळल्या नसल्याचे तपासणीत आढळले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही मोहिम राबविण्यात आली होती. तहसिलदार बालाजी सोमवंशी, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ.शितल बोपलकर, हिरेमठ, वर्षा संकपाळ, मांजरे यांनी या पथकात भाग घेतला. शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार असून, त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी स्पष्ट केले.

 
Top