बार्शी - शेतात शौचास बसण्याच्या कारणावरुन महिलांसह चौघांना मारहाण केल्याबाबत बार्शी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी भागवत झिरपे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावासाची आणि १ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली, रक्कम न भरल्यास १ महिन्यांची साधी कैदे तर दोघांची निर्दोष मुक्तता केली. भातंबरे (ता.बार्शी) येथील वाघमोडे यांच्या शेतात शौचास बसणार्‍या महिलांना दगड व काठीने मारहाण केल्याबाबतची फिर्याद सिध्देश्वर झोंबाडे यांनी ११ नोव्हेंबर २००३ रोजी वैराग पोलिसांत दाखल केली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी हवालदार दराडे यांनी न्यायालयासमोर अहवाल सादर केला. सरकारपक्षातर्फे प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. याप्रकरणी फिर्यादी, जळमी, वैद्यकिय अधिकारी यांच्यासह १२ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. बाबुराव वाघमोडे (वय ४५), काशीनाथ वाघमोडे (वय ४०) असे याप्रकरणी कारावासाची शिक्षा मिळालेल्यांची तर जयदेव वाघमोडे आणि शामराव वाघमोडे असे निर्दोष सोडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 
Top