उस्‍मानाबाद - शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नेहमीच शेतकरी व त्यांच्या हिताचाच विचार केला आहे. त्यांच्या संकल्पेनुसारच उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ८५ शेतकरी कुटूंबातील मुलांना जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी बोलाताना दिली.
      निसर्गाची मनमानी, सतत होणारी नापिकी, जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या सहकारी संस्था व याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात या जिल्ह्यातील ८५ शेतक-यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकNयांच्या कुटूंबियास रोख आर्थिक मदत करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकNयांनी आत्महत्या करु नये यासाठी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोनारी ते तुळजापूर अशी शेतकरी आत्महत्या बचाव जनजागरण दिंडी काढण्यात आली होती. 
या विचाराचाच एक भाग म्हणून आत्तापर्यंत जिल्ह्यातील ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या अशा ८५ कुटूंबातील शेतक-यांच्या मुलांना व मुलींना शिवसेनेच्या वतीने शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येणार असून या सर्व विद्याथ्र्यांचा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षणाचा खर्च शिवसेना करणार आहे. जिल्ह्यात अशी जवळपास १९० विद्यार्थी असून या सर्व विद्यार्थ्‍यांचा उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दुपारी १२ वाजता भोसले हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा सपंर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâ प्रमुख अनिल खोचरे , खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेनेचे जिल्हाधिकारी सुरज साळुंके, भाविसेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी उद्या दुपारी १२ वाजता भोसले हायस्कुलमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केले आहे. 

 
Top