उस्मानाबाद -  जिल्ह्याचे आर्थीक जीवनमान उंचावण्यासाठी व विकास साधण्यासाठी  शेती हे एक उत्तम साधन व पर्याय आहे. शेतीच्या माध्यमातूनच  जिल्ह्याचा विकास होवू शकतो. तेंव्हा शेतीचे महत्व लक्षात घेवून तरुण व सुशिक्षित शेतक-यांनी शेतीसाठी आवश्यक असणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन फुल शेती, पॉली हाऊसच्या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढवून आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत  नारनवरे यांनी केले. 
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषि विभाग, आत्मा, के. एफ बायोप्लॉटन्स,पुणेच्या संयुक्त विदयमाने  आयोजित पॉली हाऊस मधील लागवड शेतकरी  गट प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. दुपारगुडे, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, तालुका कृषि अधिकारी डी.आर.जाधव, शिवनेरी फुल उत्पादकचे  श्री. घोगरे, फुल उत्पादक शेतकरी, शेतकरी गटाचे प्रमुख   व  प्रगतीशील  शेतकरी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, इस्त्राईलमध्ये कमी पाऊस पडूनही तेथील शेतकरी आधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती उत्पादनात क्रांती केली आहे. फ्रान्स हा देश सुगंधी फुलशेती उत्पादन करणारा देश आहे. तेथे सुगंधी फुलास जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तेंव्हा उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी  त्या देशाचा आदर्श घेवून शेती करावी. शेतकरी गटाच्या माध्यमातून फुलशेती, पॉली हाऊसची शेती करुन स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन केले. 
डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत सर्व तरुण शेतकऱ्यांनी  योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगून उस्मानाबादचा शेतकरी कष्टाळू व प्रगतीशिल शेतकरी आहे. द्राक्ष उत्पादन करुन बाहेर देशास द्राक्षाची  निर्यात करतात. शेतकरी गटाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निसर्गावर मात करण्यासाठी  शेतकरी गटाने  जलयुक्त शिवार योजनतून पाणलोटाची नालाबंडींगची शेततळीची कामे घ्यावीत व  पडणारे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास आपल्या शेतात कायमस्वरुपी पाणी राहते कोणतेही पीक घेण्यास वाव असल्याचे त्यांनी नमुद केले.
 डॉ. नारनवरे म्‍हणाले की, जिल्ह्यात फुलशेतीसाठी मोठया प्रमाणात वाव आहे.  उस्मानाबादची फुले आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली तर  नाशिक जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहेत. पॉली हाउस व ग्रीनहाऊस शेतीसंदर्भात ते म्हणाले की, कमी खर्चात फायदेशिर फुल शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
गेल्या 3 वर्षापासून या जिल्हयास पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने कृषि मालाच्या उत्पादनावर त्याचा मोठा परीणाम होत आहे. या जिल्ह्यात गेल्या 7 महिन्याच्या कालावधीत 14 हजार 500 शेतकरी गट निर्माण झाले आहे. ‍ शिवाय जिल्ह्यात शेतकरी गटांनी 26 कंपन्या स्थापन केल्या आहेत. 
प्रारंभी  मनीष चाकुरकर यांनी ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस, प्लॅट, प्लावरची पैकींग, फुलशेती व शेततळीबाबत  माहीती दिली. यावेळी शेतकऱ्यांना सिनेस्लाईडव्दारे फुलशेतीची माहिती समजावून  सांगितले.यावेळी जी पीएल कंपनी पुणेचे श्री. देवेधरे यांनी ग्रीन हाऊस तंत्रज्ञानात पाच घ्ज्ञटक तापमान, आर्दता, कार्बडनडाय ऑक्साईड आदी घटकाची  माहिती शेतकऱ्यांना समजावून सांगितले. पुणे येथील श्री. देवधरे यांनी पॉली हाऊससाठी जमीन,रस्ता,पाणी असणे मूलभूत घटक असून पॉली हाऊसमुळे होणारे फायदे याची माहिती त्यांनी  सांगितले.
या कार्यशाळेस शेतकरी, शेतकरी गट, फुलशेती बागायतदार, पॉलीहाऊसचे शेतकरी मोठ्या संख्येने कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top