उस्मानाबाद - कृषी विभागाने शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व सर्व विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तातडीने गरजू व पात्र शेतक-याना या योजनेचा लाभ मिळवून दयावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. येथील जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात शेतकरी अपघात विमा योजनेच्या बैठकीत  डॉ. नारनवरे बोलत होते. 
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील,  जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी सुमन रावत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, निवासी  उपजिल्हाधिकारी  श्रीरंग तांबे, शिल्पा करमरकर,‍प्रभोदय मुळे, सरकारी वकील अॅड. शिंदे, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक श्री. बडे, अतिरीत पोलीरस अधिक्षक  भांगे आदि उपस्थित  होते.
कृषी विभागाने आरोग्य विभागाकडून शेतक-यांचे मृत्युबाबतचा  अहवाल तातडीने घ्‍यावा, गृह विभागाने वेळेत चौकशी अहवाल तयार करुन दयावा. कृषी विभागाने तातडीने कार्यवाही करुन परीपुर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून  शेतक-यांना वेळेत शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ त्वरीत मिळवून देण्‍याचे  आवाहन  डॉ. नारनवरे यांनी केले. प्रारंभी कृषी अधिक्षक कृषिअधिकारी  तोटावार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.                      

 
Top