पांगरी (गणेश गोडसे) :- दुचाकी व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना पुणे-लातूर राज्यमार्गावर ढेंबरेवाडी (ता.बार्शी) येथे घडली.
मंडलिक शाहू वाघमारे व सतीश त्रिंबक वाघमारे दोघेही (रा.सातेफळ ता.कळंब) अशी अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
  वैभव जगन्नाथ अंधारे वय 25 रा.भांडगाव ता.परांडा जि.उस्मानाबाद यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, बोलेरो गाडीने कट मारल्यामुळे कार क्रमांक एम.एच.13 बीएन 1649 ही खड्यात गेली. टायर अडकल्यामुळे टायर फुटून समोरून येणार्‍या एम.एच.25 एन 3654 हिची व कारची धडक बसली. पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार दत्ता भालेराव हे करत आहेत.
 
Top