बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) जागतीक महिला दिनानिमीत्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी,उपशाखा बार्शीच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या रक्त तपासणी शिबीराला उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद मिळाला. यच शिबीरात विविध वयोगटातील ९५० महिलांची रक्त तपासणी करण्यात आली पं.जवाहरलाल हॉस्पिटल कंपौंड येथे घेण्यात आलेल्या या शिबीराचा शुभारंभ ङ्गौजदार भारती वाटोरे यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी डॉ मिरा गोदेपुरे होत्या यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्षा अरुणा परांजपे, नगरसेविका मगल शेळवणे, संगीता मेनकुदळे,डॉ सुनिताजगताप या होत्या सकाळपासूनच या शिबीरात तपासण्या करुन घेण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती महिलांचे थवेच्या थवे ग्रुपने शिबीराच्या स्थळी येत होते यामध्ये ऐंशी वर्षाच्या महिलेपासून विस वर्षाच्या मुलींचाही समावेश होता नक्त नमुने घेण्यासाठी पाच ते सहा टेबलची स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबीरात संपूर्ण रक्तातील घटक मोजणीच्या १८ चाचण्या, रक्तामधील साखर, थायरॉईड, किडनीची कार्यक्षमता, कोलेस्ट्रोल, रक्तगट आदी तपासण्या करण्यात आल्या इतर वेळी या सर्व चाचण्यांसाठी सुमारे ८५० रुपये खर्च येतो परंतु या शिबीरात सहभागी महिलांची २०० रुपये नाममात्र दरात तपासणी करण्यात आली देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. स्त्रियांमधील थायरॉईड आजाराचे प्रमाण, हृदयरोग, किडनीवरील परिणाम आदी रुग्णांच्या संख्येचा विचार करुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे अजित कुंकुलोळ यांनी प्रास्ताविकात सांगीतले.
फौजदार भारती वाटोरे म्हणल्या, मी काम करीत असताना प्रत्येक स्त्री मध्ये आई पहाते,घरामध्ये किंवा समाजामध्ये एकादी महिला चुकली तर तिला माङ्ग करा,कोणतीही महिला ही स्वतापेक्षा कुटुंबाचा विचार करते स्त्री हीच स्त्रीची शत्रु आहे असे सांगत महिलांनी एकमेकीच्या चुका माङ्ग करायला शिका कुटुंबाचा विचार करणारी महिला स्वताच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते, त्यामुळे रेडक्रॉसच्या वतीने महिलांसाठी घेतलेले हे शिबीर म्हणजे महिलांसाठी एक चांगली पर्वणी आहे.
 
 डॉ मिरा गोदेपुरे म्हणल्या, रोजचा दिवस हा महिलांचाच असतो,महिलांनी आपण आपल्या प्र.तीकडे किती लक्ष देतो याचा विचार करणे गरजेचे आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असली पाहिजे असे सांगत आपल्या मुलींचे लग्न करताना दोनच मुलांवर थांबण्यास तयार असणाह्याच घरी मुलगी द्या त्यादोनमध्ये मग ते मुले असो की मुली असोत निस्वार्थीपणे काम करणाह्या रेडक्रॉसने महिलांच्या तपासणीच्या माध्यमातून चांगला उपक्रम घेतला आहे शिबीरासाठी बार्शी नगरपरिषद, ब्राह्मण सभा महिला शाखा, संस्कती क्लब आदी संघटनांच्या महिलांनी सहकार्य केले यावेळी बोलताना अरुणा परांजपे म्हणाल्या की, विवाह बंधनात अडकेलेल्या महिलांच्या खांद्यावर सतत कामाची ओझी असतात त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, अजित कंकुलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेडक्रॉसने स्तुस्त्य उपक्रम राबवला आहेघ्आजचा उपक्रम म्हणजे रेडक्रॉसतर्ङ्गे सर्व महिलांना भाऊबिजेची भेट आहे संगीता मेनकुदळे यांनी रेडक्रॉसने नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याने रेडक्रॉसचे मानावे तेवढे आभार कमी आहेत यावेळी रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपाध्यक्ष डॉ बीवाय यादव, अजित कुंकुलोळ,रामचंद्र सोमाणी,सहसचिव सुभाष जवळेकर,सचिव काका सामनगावकर, संचालक अशोक डहाळे ,विवेकानंद देवणे, व्ही तिरुपती आदी उपस्थित होते प्रास्ताविक अजित कुंकुलोळ यांनी केले तर आभार विजय दिवाणजी यांनी मानले.शिबीर यशस्वी करण्यासाठी धिरज कुंकुलोळ, उदय पोतदार, विनोद गायकवाड, सुधाकर झरकर, यश कुंकुलोळ ,यांच्यासह श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या कर्मचाह्यांनी परिश्रम घेतले.

 
Top