उस्मानाबाद - भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी विंधन विहीरी व बोअरचे अधिग्रहण करावे. जनतेस पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे. आवश्यक तेथे शासकीय टँकरनेच पाणी पुरवठा करावा. टँकरच्या जास्तीचे  फे-या  वाढवून पाणीपुरवठ्याकडे लक्ष दयावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व ‍उपजिल्हाधिकारी व सर्व तहसीलदाराच्या  आढावा बैठकीत  डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग ताबे, शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदि  उपस्थित होते.
डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, जलसाठयातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. पाणी साठ्यातून शेतीसाठी पाण्याचा उपसा होण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा होत असल्यास संबधित तहसीलदार व गटविकास अधिका-याने त्‍यांच्या मोटारी जप्त करुन आवश्यक ते कार्यवाही करावी. असे निर्देशनही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की,  सिंचन विहीर, कृषी, जलसंधारणाची अपूर्ण असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या कामास गती  देण्यासाठी  प्रत्येक गावात 10 ते 15 शेतक-यांचा व ग्रामजूरांचा एक गट स्थापन करावा. शेतीची कामे ग्रामशेती गटास तर ग्राममजूरांना रस्त्याची व इतर रोजगाराची कामे देवून देण्याचे निर्देश दिले. तसेच  सुवर्ण जयंती, राजस्व अभियानांतर्गत  गावस्तरावर राबवून तेथे आधरकार्डची कामे करुन घ्यावीत. गटविकास अधिका-यांनी मृदसंधारण, जलसंधारण कृषी विकास कामाकडे लक्ष दयावे. ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ति करावी. गावात दंवडी देवून सभा घ्यावी, ग्रामरोजगार सेवकाच्या  ‍बैठका नियमीत घेवून केलेल्या कामाचा आढावा घ्यावा. गावस्तरावरील अपुर्ण शौचालयाची कामे वेळेत पुर्ण करावीत.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रावत म्हणाल्या की, मजूरांच्या मागणीनुसार कामे मंजूर करावीत. यात  61 टक्के कामे कृषी विभागाच्या  सिंचन विहीरीची असल्याने ही कामे  येत्या 15 दिवसात पूर्ण केली जावीत. तांबे यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची व त्यावर उपलब्ध असलेल्या मजूराची माहिती दिली.     
 
Top