उस्मानाबाद - प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांनी आदिवासी (मुलांचे) शासकीय वसीगृहातील चौकीदार हिराकुंर तुकाराम खिलारे यांनी  रा. मुक्‍काम एन-9,एच-83/1 श्री .कृष्णानगर हुडको,औरंगाबाद ता.जि. औरंगाबाद हे 24 जुलै 2009 पासून या कार्यालयास कोणतीही  पुनर्वसूचना न देता व परवानगी न घेता अनाधिकृतपणे परस्पर कामावर  गैरहजर आहेत. खिलारे यांना त्यांच्या स्थाई पत्यावर पत्रव्यवहार करुन  संपर्क केला परंतु अदयाप पावेतो  त्यांनी कामावर रुजू झालेले नाहीत. 
तेंव्हा हिराकुंर खिलारे नोटीस प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसाच्या आत त्यांनी  प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी आर्कीटेक्स कॉलेजच्यामागे, कुमठा नाका परीसर, सोलापूर -413003 दुरध्वनी क्रमांक 0217-2607600 या कार्यालयास गेरहजेरीबाबत  सबब पुराव्यासह प्रत्‍यक्ष हजर रहावे. अन्यथा आपणास शासनाची सेवा करावयाची इच्छा नाही, असे गृहीत धरुन आपल्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवानियम 1979 शिस्त व अपील तसेच वर्तणूक अन्वये सदर नियमातील तरतुदीच्या आधीन राहून प्रशासकीय तथा सेवा समाप्तीची कार्यवाही करण्यात येईल.
खिलारे यांनी आदिवासी (मुलांचे) शासकीय वसतीगृह, उस्मानाबाद चौकीदार या पदावर  तात्काळ कामावर रुजु होण्याबाबतची शेवटची संधी देण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.          
 
Top