उस्मानाबाद - लेखा व कोषागारे विभागाच्या मराठवाडा विभागाचे वेतनपडताळणी पथक दि. 24 ते 27 मार्च,2015  या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर  येत आहे. या दौऱ्यात हे पथक सेवापुस्तकांची  पडताळणी करणार आहे.  
            दि. 24 रोजी पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, उस्मानाबाद तर  25 ते 27 मार्च या कालावधीत जिल्हा/ तालुकास्तरावरील इतर कार्यालयातील कर्मचा-यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यात येणार आहे. 
          सेवापुस्तके पडताळणीस सादर करताना सर्व आहरण व संवितरण शासन निर्णय वित्त विभागाचे क्र वेपुर-1299/प्रक्र-5/99/ सेवा, 10 दिनांक 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबधितांच्या सेवा पुस्तकात लावून सेवा पुस्तके पडताळणीसाठी सादर करावीत. तसेच पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन/ लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करुन डिडिओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजर एन्ड पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ एम्प्लॉई आयडी टाकून सबमिट करावे, असे आवाहन सहसंचालक, लेखा  व कोषागारे, औरंगाबाद यांनी केले आहे.  

 
Top