उस्मानाबाद - जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सन-2015 या वर्षाकरीता उस्‍मानाबाद जिल्ह्यासाठी खालील तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
यानुसार शनिवार, दि. 4 एप्रिल,2015 रोजी हनुमान जयंती, गुरुवार, दि. 7 मे रोजी हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे ऊरुस आणि मंगळवार, दि. 13 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना सणानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शिक्षण संस्थाना वरील सुट्टी लागू राहील.
हा आदेश उस्मानाबाद जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयांना व केंद्र शासनाची कार्यालय आणि बँकाना लागू राहणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन   जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका  प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. 

 
Top