पांगरी (गणेश गोडसे) मनात जिद्द असल्यास व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास ते काम निश्चितच सिद्धीस जाते याचा प्रत्यय बार्शी तालुक्यातील येळंब या छोट्या खेड्यातील बळवंत चौधरी व पवन गलांडे या तरुण प्रयोगशील शेतकर्‍याने समाजाला दिला आहे.सततचा दुष्काळ,धोक्यात आलेली फळबागांची शेती,पावसाचे खालावत चाललेले प्रमाण या गोष्टीवर मात करण्यासाठी व फळबागायती टिकवण्यासाठी धडपड्या शेतकर्‍याने कवटाच्या जंगली झाडावर प्रयोग करत त्यावर मोसंबीचे कलम करून हा प्रयोग यश्यस्वी केला आहे.हा प्रयोग यश्यस्वी होऊन कलमाना फुले लागल्यामुळे बार्शी तालुक्यासह  सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरत असून हा प्रयोग राज्यातील शेतकर्‍यासाठी लवकरच एक वरदान ठरु
ण शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळून आर्थिक बाबतीत साधन होण्याची शक्यता आहे.
    कवटावर मोसंबीचे कलम यासंदर्भात संबंधित शेतकर्‍याकडे चौकशी केली असता द्राक्षाला जसे जंगली रूसटॉककाडीचा जमिनीवर आधार देऊन पुन्हा त्यावर इतर वाणाचे कलम केले जाते त्याच धर्तीवर मोसंबिसाठी मी अनेक वर्षापासून कलमासाठी त्याच प्रजातीमधील झाड शोधत होतो असे सांगितले.मोसंबिसाठी अल्प पाण्यावर उन्हाळ्यातही टिकावा धरणार्‍या जंगली कवटाच्या झाडाची निवड करून त्यावर प्रयोग करायचे निश्चित करून जंगलातून कवटाच्या बिया गोळा केल्या.त्या बिया पिशवीत लावून त्याचे झाडात रूपांतर झाल्यानंतर दोन महिन्यापूर्वी त्या कवटाच्या झाडावर मोसंबीचे कलम केले.दोन महिन्यातच त्या कलमाला फूल धारणा झाली असून हा प्रयोग यश्यस्वी झाला आहे.या उपक्रमास दोन वर्षाचा कालावधी लागल्याचेही बळवंत चौधरी यांनी सांगितले.
  प्रचलित मोसंबिस फूल व फलधारणा होण्यासाठी साधारणत: चार वर्षाचा कालावधी लागतो.मात्र विकसित करण्यात आलेल्या या मोसंबीच्या वानास अत्यल्प पाण्याची गरज भासते॰हे झाड जास्त फळे व मोठी फळे देऊन भक्कम रहाणार आहे.खोडकिडा याचा प्रतिकार हे झाड सहजगत्या करू शकणार आहे.मोसंबी उत्पादकास आता जास्त काल फळाची वाट बघावी लागणार नसून हे मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना एक पर्वणीच ठरणार आहे.हा प्रयोग पहाण्यासाठी सध्या उस्मानाबादसह,सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी गर्दी करत आहेत.
चौकट: आपल्या या प्रयोगाची माहिती आपण कृषि विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या मार्फत भारतीय कृषि अनुसंशोधन परिषदेस कळवली असल्याचे बळवंत चौधरी यांनी पुढारी प्रतिंनिधीशी बोलताना सांगितले.

 
Top