उस्मानाबाद -  जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन शासनाकडून  झालेल्या आहेत. त्या शेतक-याला पुनर्वसन विभागाकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते ‍जिल्हा धिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. 
यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, विभागीय उपआयुक्त (पुरवठा) अनिल रामोड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरविंद लाटकर, निवासी उपजिल्हाधिकारी  श्रीरंग तांबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह महसूल विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 
कळंब तालुक्यातील ज्ञानोबा कराड, सुनंदा धोंडीबा गवारे, सुंदर खराटे, बिभीषण भांगे आणि बाळासाहेब गवळी. उस्मानाबाद तालुक्यातील कळमकर पांडूरंग, भारत करवर, राठोड आकाश, सोपान गरड, रामचंद्र धनके, व्यकंट गुंड, दत्तात्रय कोळी, सुधाकर पांडूरंग घोडेकर, प्रशांत बागल, त्रिंबक कदम, मगल पाटील, लिंबराज कदम, शिवाजी क्षीरसागर, महेश मोरे, आणि सदाशिव  सुर्यवंशी. तुळजापूर तालुक्यातील आप्पा लोखंडे, रणदीप शिंदे आणि नबीलाल होगे. परंडा तालुक्यातील  बारकुबाई सुदाम गटकुळ, बबन शिंदे, निवत्ती पवार, विश्रांती दत्ता पवार, मधु  भरणे, सर्जेराव सावंत, बळीराम सुतार, ज्ञानदेव पवार. उमरगा येथील मोहन सुर्यंवशी, उत्तमबाई सुभाष माने, जावेद मुजावर, गुलाब मनेर मुजावर, बळवंतसिंग राठोड, बाबुराव जामगे, सय्यद अझरोदीन हुसेनी चिसती. भूम येथील आब्बा हरिदास लवटे, लिंबराज शंकर कुटे, साबळे दत्तु, धोंडीबा पाटील. वाशी येथील शिवाजी दगडू दळवे, सुभाष मारुती चेडे, दत्तात्रय देशमुख. लोहारा येथील भागाबाई अंबादास मस्के या उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 
जिल्ह्यातील उस्मानाबाद-25, तुळजापूर-12, उमरगा-8, लोहारा-1, कळंब -9, परंडा-13, वाशी -7 आणि  भूम-5 असे एकूण 80 प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. 
यावेळी श्री.लाटकर प्रास्ताविकात म्हणाले की, जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांच्या सूचनेनुसार वेळेत व कालबध्द काम पूर्ण करण्यास प्राधान्य देऊन संबंधितांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्राबाबत पूनर्वसन विभागातील .चंद्रकांत शिंदे, श्रीमती माजलगावर,  हाके आणि एस.आर.पवार यांनी  परिश्रम घेतले.            
                         

 
Top