उस्मानाबाद -  ग्राहकांना सोने,चांदी व मौल्यवान धातूंची  विक्री करणाऱ्या  व्यावसायीकांना सूचित करण्यात येते की, सोने, चांदी व मौल्यवान वस्तू वजनासाठी वापरण्यात येत असलेली तोलन उपकरणे योग्य त्या अचुकता वर्गाची नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी नियंत्रक महाराष्ट्र वैध मापनशास्त्र अंमलबजावणी यांना प्राप्त झाल्या  आहेत. सर्व सोने, चांदी व मौल्यवान धातुच्या व्यवसायामध्ये 1‍मि. ली ग्रॅम अचुकता 1 Mg. Acccuracy) असलेले वर्ग 1 किंवा वर्ग 2 या अचुकता वर्गाचीच इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे वापर करावा, असे आवाहन अ. ध. गेटमे, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, लातूर व उस्मानाबाद यांनी केले आहे.             

 
Top