उस्मानाबाद - माहे जुलै ते डिसेंबर-2015 या कालावधीत जिल्ह्यातील-429 ग्रामपंचायीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत तसेच माहे एप्रिल-2015 मध्ये एकुण 161 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका होणार आहेत.
 आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.  इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीबाबतच अर्ज सहा महिने अगोदर संबधित जात पडताळणी समिती लातूर / औरंगाबाद येथे दाखल  करणे आवश्यक आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.    

 
Top