पांगरी (गणेश गोडसे) :- सततच्या दुष्काळामुळे अगोदरच जीव मेटाकुटीला आलेल्या शेतक-यांना 'सालगड्याची' व्यवस्था करता करता अनंत समस्यांचा सामना करावा लागत असून सालगड्याच्या 'सालात'यावर्षी भरिव वाढ होऊन पुढील वर्षीचा सालगडी 'लखपती'झाला आहे. सालगड्यांच्याही अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांचा भावही खूपच वधारला आहे. अगोदरच मजूर टंचाई व त्यातच सालगड्यांचाही ठणठनाट जाणवत असल्यामुळे अगोदरच शेवटच्या घटका मोजत असलेला शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
 कृषी प्रधान देश, शेतक-यांचा देश, बळीराजा अश्या मोठमोठ्या बिरुदावल्या लावल्या जातात. पाडवा हा सालगड्याच्या व शेतक-याच्या दृस्टीने तसेच भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने शुभ समजला जातो. या दिवशी सालगड्याचे मागील साल (वर्ष) संपून नवीन सालाची सुरुवात होते. या दिवशी मागील वर्षातील खाडी, उचल, देणी-घेणी याचा मेल लावून नवीन वर्षाच्या देण्याघेण्याचा हिशोब जुळवला जातो. वर्षाचा आकडा फिक्स झाला तर आहे तेथे साल धरायचे नाहीतर नवीन ठिकाणी सालगडी होण्याची तयारी त्यांनी केलेली असते. सध्या ग्रामीण भागात सालगडी नेमण्यासाठी त्याची शोधाशोध सुरू आहे. अगोदरच अवकाळी पाऊस, गारपीठ, पाचवीला पूजलेला कायमचा दुष्काळ यामुळे अगोदरच बळीराजा त्रस्त झालेला आहे.चालू वर्षी दोन्ही हंगामातील उत्पन्नाचा व खर्चाचा ताळमेळ लावून बघितला असतां बळीराजाला खाजगी कर्ज काढून 'सालगड्याची'देणी देन भाग पडत आहे.
  गुढी पाढव्याच्यामुहूर्तावर चांगल्या सालगड्याची नियुक्ती व्हावी यासाठी शोधमोहीम करून निवड केली जाते. प्रसंगी पार जिल्ह्यातूनही सालगड्यासाठी चाचपणी केली जात आहे.मात्र सगळीकडेच जेमतेम अशीच स्थिती असल्यामुळे सालगड्यांचे चांगलेच फावत आहे.वाढत्या महागाईमुळे साल वाढवून घेण्यात सालगड्याची चूक नसली तरी आर्थिक फटका मात्र शेतक-यांनाच सहन करावा लागतो.त्यात भरीस भर म्हणून सालगडी सुट्ट्या,भत्ते,यासह फोन बिल,पेट्रोल खर्च याचीही सुरवातीस उघड मागणी करू लागले आहेत.
 त रुण पिढी शेती ऐवजी नौकरी,व्यवसायाला महत्व देत आहेत.दिवसेंदिवस मजुरांची टंचाई वाढतच असल्यामुळे सालगड्यांना महत्व वाढ आहे.माजुरपेक्षा सालगडी स्वस्थत भेटायचे मात्र सध्या ती परस्थिती निदर्शनास येत नाही.
‘पोरगं शिकाल अन शेतीपासून हुकल’अशीच कांहीशी अवस्था दृस्टीस पडत आहे.शेतक-यांनी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल पोर शिकवलं मात्र ते पोर शेतीला कमी दर्जाचे समजून रोजगारासाठी शहरात कंपन्यांची दारे पूजताना दिसत आहे.
 
Top