उस्मानाबाद  - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2001 नुसार वंचित, दुर्बल घटकातील व अपंग बालकांना 2015-16 या वर्षात 25 टक्के (अल्पसंख्याक विना अनुदानीत शाळा वगळून) प्रवेश देण्यात येणार आहे.  पुर्व प्राथमिक वर्गातील प्रवेश क्षमता    इ .1 ली मधील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त असल्यास इयत्ता 1. ली मधील प्रवेश क्षमतेनुसार  25 टक्के जागा राखीव ठेवून त्यावर पुर्व  प्राथमिक वर्गामध्ये प्रवेश देण्याचे निर्देश  शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परीषद, उस्मानाबाद यांनी दिले आहेत.                     
            पुर्व प्राथमिक वर्गातील प्रवेश क्षमता इ .1 ली मधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी असल्यास पुर्व प्राथमिक वर्गाला जेवढी प्रवेश क्षमता असेल, त्याच्या 25 टक्के प्रवेश पुर्व प्राथमिक वर्गाला देण्यात यावेत. उर्वरीत प्रवेश क्षमता इयत्ता 1. ली मध्ये देण्यात यावेत. पुर्व प्राथमिक वर्गाची प्रवेश प्रक्रीया झाल्यावर कांही जागा रिक्त राहील्यास सदर जागा इयत्ता 1 ली च्या प्रवेशाच्यावेळी देण्यात याव्यात.    वंचित घटक-अनुसूचित जाती, अनूसुचित जमातीची बालके, दुर्बल घटक-विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्ही. जे. एन. टी.) इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेषमागास वर्ग (एस. बी. सी). आणि राज्य शासनाने विहीत केलेले धार्मीक अल्पसंख्याक यासह ज्या पालकांचे वार्षीक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहेत, अशी बालके. अपंग-40 टक्‍केपेक्षा जास्त. 25 टक्के प्रवेशाच्या जागेसाठीची आरक्षणाची पध्दत नमुना नंबर 1 मध्ये मुख्याध्यापकांनी सूचना फलकावर दर्शनी भागात लावून पालकांनी मोफत जागेचा अर्ज नमुना 2 मोफत नजीकच्या परीसरातील शाळेतून 15 एप्रिल, 2015 पासून घ्यावा. प्रवेश अर्जासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचे 2014-15, जातीचे प्रमाणपत्र बालकाचे किंवा पालकांचे, निवासाचा पुरावा, आधारकार्ड/ निवडणूक प्रमाणपत्र/ पाणीपट्टी /दुरध्वनी बील यापैकी एक, जोडून नजीकच्या शाळेत 25 टक्के प्रवेशसाठी अर्ज सादर करावा व मुख्याध्यापकांकडून नमुना नंबर 3 मधील अर्ज प्राप्त झाल्याची नोंदणी पावती मुख्याध्यापकांकडून पालकांनी घ्यावी.
              मुख्याध्यापकांनी पालकास 25 टक्के प्रवेशाबाबत मार्गदर्शन करावे. मोफत जागेवर प्रवेशासाठी अर्जांची संख्या कमी असल्यास उपलब्ध अर्जातून प्रवेश देण्यात यावेत. अर्जाची संख्या जास्त असल्यास पालक, शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी , शाळेच्या व्यवस्थापनाने   नामनिर्देशीत केलेली एक व्यक्ती व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी खालील नामनिर्देशित केलेले नियंत्रण अधिकारी अशा किमान सदस्यांच्या ‍‍उपस्थितीत सोडत काढून या जागावर प्रवेश देण्यात यावेत. 25 टक्के प्रवेशाच्या संदर्भात नियंत्रण अधिकारी खालीलप्रमाणे नियुक्त करण्यात आलेले आहेत.25 टक्के प्रवेशाबाबत कांही अडचणी आल्यास संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती  यांचेशी संपर्क साधावा अथवा शिक्षण विभाग,जिल्हा परीषद कार्यालयातील 25 टक्के प्रवेश कक्षाशी संपक साधावा. त्यासाठी अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. एस. एम. जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 9423766271, एन. आर. जगदाळे उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 9850042834, यु. ए. सांगळे, शिक्षण विस्तार  अधिकारी-9422654756, ए. आर. खुळे- शिक्षण विस्तार  अधिकारी, 9423656732 वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकातील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी या योजनेचा लाभ घेण्‍याचे  आवाहन करण्‍यात आले. 

 
Top