उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील मयत न्यायाधिन बंदी क्रं.1084/14 नामे हणुमंत काशिनाथ गायकवाड  रा. सरमकुंडी ता. वाशी यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे वैदयकीय उपचार चालू असतांना 31 जुलै रोजी मृत्यु झाला. या प्रकरणाची फौजदारी प्रक्रीया संहिता 1973(2) /1974 मधील तरतूदीनुसार फेरचौकशी करण्यासाठी उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी अभिमन्यु बोधवड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मयताच्या नातेवाईकास त्यांचे मृत्युबाबत काही माहिती किंवा त्यांचे काही म्हणणे असेल तर तसे त्यांनी त्यांचे सबळ पुराव्यासह 20 एप्रिल, 2015 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हजर राहून आपले म्हणणे पुराव्यानिशी दाखल करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.  

 
Top