उस्मानाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताहात दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना प्रसारमाध्यमांमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी या योजनांची माहिती संबंधीतांना देण्यात येणार आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त  एस.के. मिनगिरे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन  मिनगिरे यांनी केले आहे.

 
Top