पंढरपूर :- जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने शनिवार दि.11 एप्रिल  रोजी पंढरपूर शहरात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली या मोहिमेंतर्गत सुमारे 80 मे.टन कचरा गोळा करण्यात आला. 
या स्वच्छता मोहिमेसाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले हो
ते.  प्रारंभी  मान्यवरांच्या हस्ते नामदेव पायरी पासून  या  मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे 9 हजार कर्मचा-यांनी आपला सहभाग नोंदविला. या सर्व कर्मचा-यांनी पंढरपूर शहरातील नदीपात्र (वाळवंट), वाखरी पालखी तळ, चंद्रभाग बसस्थानक, संतपेठ परिसर, महात्मा फुले चौक, तीन रस्ता परिसर, तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, महाद्वार घाट, गोपाळकृष्ण मदिर, प्रांत कार्यालय  त्याचबरोबर पंचायत समिती, सां.बा.विभाग, पोलीस कॉलनी, तहसील कार्यालय, रेल्वे स्टेशन आदी परिसरातील कचरा गोळा करुन तो परिसर  स्वच्छ केला.
या स्वच्छता अभियानामध्ये 13 जेसीबी, 9 ट्रॅक्टर, 27 टीप्पर सहभागी झाले होते. त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आपला सहभाग उत्स्फुर्तपणे नोंदविला. या मोहिमेनंतर श्री. काकाणी यांनी विश्रामगृह ( पंढरपूर) येथे पत्रकार परिषद घेऊन उपस्थितीत  पत्रकारांना या मोहिमेच्या यशस्वीतेबाबत माहिती दिली. तसेच पुढील  स्वच्छता मोहिमेत पंढरपूर शहरवासीयांनी  आपला  सहभाग नोंदवावा त्याचबरोबर शहर स्वच्छ ठेवण्यास नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले. भविष्यात ही स्वच्छता मोहिम जिल्हा प्रशासनातर्फे सुरुच ठेवणार  असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. 
या स्वच्छता मोहिमेत अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी  दिनेश भालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, प्रांतधिकारी शहाजी पवार, श्रीमंत पोटोळे, संजय तेली, सहाय्यक  आयुक्त समाजकल्याण श्रीमती  मनिषा फुले,  जिल्हा क्रिडा अधिकारी  भाग्यश्री बिले, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी,  सर्व न.प. मुख्याधिकारी, सर्व शासकीय कार्यालयातील कार्यालयीन प्रमुखांसह ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top