पांगरी (गणेश गोडसे) विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे निम्मे गाव अंधारात रहात असल्याचा प्रकार गत  अनेक दिवसापासून आगळगाव ता.बार्शी येथे घडत असून आगळगाव ग्रामस्थामधून विज वितरण कंपनीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    आगळगाव या आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावास शिंगाळ फेज योजनेअंतर्गत तिन ट्रान्सफॉर्मर वरुण विज पुरवठा केला जातो.मात्र बस स्थानकासमोरील डेपो नादुरुस्त झालेला असल्यामुळे निम्मे गाव अंधारात बुडालेले आहे.विज कर्मचार्‍यास गावात रहाण्याची सक्ती असतांनाही कोणीही कर्मचारी गावात रहात नसल्यामुळे रात्री अपरात्री विजेत बिघाड निर्माण झाल्यास कंपनीचा कर्मचारी दुसर्‍या दिवशी सकाळी बार्शीहून आल्याशिवाय तो बिघाड दुरुस्त होत नाही.त्यामुळे ग्रामस्थांना पूर्ण रात्रच अंधारात काढावी लागते.याबाबत विज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता वायरमणकडे चौकशी करा असे उद्धट उत्तर दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तरी विज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी याकडे लक्ष केन्द्रित करून विज पुरवठा सुरळीत करावा अशी आगळगाव ग्रामस्थांची मागणी आहे.

 
Top