उस्मानाबाद - पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गंत सोनोग्राङ्गी तज्ञांवर एङ्ग ङ्गॉर्म भरण्यासंदर्भात क्षुल्लक त्रुटींवरून होणार्‍या अन्यायाविरोधात व कायद्यात आवश्यक दुरूस्ती व्हावी यासाठी उस्मानाबाद स्त्रीरोग तज्ञ संघटना, आयएमए व रेडिओलॉसीस्ट संघटनांनी सोनोग्राङ्गी बंद ठेवून देशव्यापी संपात सहगागी झाले होते. 
            या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना स्त्रीरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. मीना जिंतुरकर, आयएमएचे सचिव डॉ. राहुल देशमुख व रेडीयालॉसीस्ट डॉ. हुंबे यांनी निवेदन दिले. तसेच याप्रसंगी डॉ. कठारे, डॉ. राजगुरू, डॉ. कार्तिक यादव, डॉ. मैंदरकर, डॉ. हंबीरे, डॉ. गरड, डॉ. सरडे, डॉ. रजनी पाटील, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. पल्ला आदी उपस्थित होते. तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशीही सर्वांनी चर्चा करून निवेदन दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व कळंब येथील डॉक्टर्सही आज सोनोग्राङ्गी बंदमध्ये सहभागी झाले होते. कळंब येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. लक्ष्मण जाधवर, डॉ. तारे, डॉ. दिनकर मुळे यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देवून कायद्यात बदल करण्याची मागणी केली. उमरगा येथेही डॉ. उदय मोरे, डॉ. दीपा मोरे, डॉ. थिटे, डॉ. लोहारेकर, डॉ. घोडके, डॉ. कुमुर, डॉ. शेंडगे, डॉ. अजित शिंदे यांनी तहसीलदार वसंत नवनीत, उपविभागीय पोलीस अधिकारी कलासागर यांना भेटून निवेदन दिले. 

 
Top