नळदुर्ग -  खा. रामदास आठवले यांच्‍या नेतृत्‍वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्‍या शाखेचे उदघाटन मौजे गुळहळ्ळी ता. तुळजापुर येथे रिपाइंचे जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात  आले. 
         या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी रिपाइंचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन  मराठवाडा विभाग उपाध्‍यक्ष आनंद पांडागळे, सोलापुर जिल्‍हा सचिव सोपान गायकवाड, सोलापुर जिल्‍हा युवा आघाडीचे सरचिट‍णीस संदिप गाकवाड, रिपाइं तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के गायकवाड आदि उपस्थित होते. प्रारंभी तथागत महात्‍मा गौतमबुध्‍द व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमांचे पुजन उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करुन रिपाइं नामफलकाचे फित कापून उदघाटन करण्‍यात आले. यावेळी बोलताना आनंद पांडागळे म्‍हणाले की, रिपाइं कार्यकर्त्‍यानी जागरुकपणे गावाच्‍या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होऊन गावाच्‍या विकासाला गती द्यावी. यावेळी रिपाइं युवा आघाडीचे तालुका अध्‍यक्ष अरुण लोखंडे, युवा तालुक उपाध्‍यक्ष विशाल मस्‍के, सचिव चंद्रकांत दुपारगुडे,  नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, बंटी नारायणकर,  शंकर कांबळे, कमलाकर बनसोडे, तुकाराम डावरे आदी उपस्थित होते. यावेळी तानाजी कदम यांनी  गुळहळ्ळी शाखेची कार्यकारणी जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे शाखा अध्‍यक्ष दुष्‍यंत गायकवाड,  उपाध्‍यक्ष नागनाथ गायकवाड,  सचिव राजकुमार सोनकांबळे, कार्याध्‍यक्ष सिकंदर वाघमारे, सह कार्याध्‍यक्ष उमेश पात्रे, सहसचिव दत्‍ता सोनकांबळे, सुरेश गायकवाड, संघटक अंकुश काळुंके, अमरसिंग ठाकुर, सहसंघटक माणिक काळुंके, सल्‍लागार एम. डी. गायकवाड आदी. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचलन दिनकर गायकवाड यांनी केले तर आभार राजकुमार सोनकाबळे यांनी मानले.   

 
Top