उस्मानाबाद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत वाशी तालुका स्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            वाशी तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार आर. व्ही. गोरे, सदस्य पंचायत समितीचे सभापती लक्ष्मीकांत आटोळे, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य प्रशांत चेडे, गट विकास अधिकारी श्री. वाड, सहायक सरकारी वकील अॅड. कवडे, तालुक्यातील  पोलीस ठाण्याचे प्रमुख एस. जी. शिंदे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापण अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आला आहे.  पत्रकार यांचे प्रतिनिधी नितीन टेकाळे, मुकुंद चेडे,  तर मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे पॅनेलवरील एक वकील अॅड व्ही. पी. कवडे यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.                 
 
Top