पांगरी (गणेश गोडसे) :- कोणतीही जयंती म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते वर्गणीचे बुक घेऊन टोळक्याने फिरून जबरदस्तीने पट्टी मागणारे तरुण. त्यातून दाखल होणारे खंडणी, दरोडयासारखे गंभीर गुन्हे. मात्र बार्शी तालुक्यातील पांगरीसारख्या खेड्यातील छोट्या गावात मात्र मोठ मोठे विचार रुजलेले आहेत. गत 25 वर्षापासून येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावात कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता, ग्रामस्थांना त्रास न देता फक्त समाजातूनच स्वयंस्फूर्तीने मिळणार्‍या पैशातूनच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. पांगरीचा आदर्श घेऊन व पूर्वी पेरलेल्या बिजातून आज पांगरिपरिसरतील 60 ते 65 गावात पांगरीच्या जयंतीचा आदर्श घेतला गेला आहे ही बाब उल्लेखनीय आहे.
       आंबेडकरी चळवळीचे केंद्र ठरू पहात असलेल्या पांगरीत स्वत:चा उपक्रम,उत्सव, सन, वार, हे उस्फूर्तपणे साजरे करताना त्याचा इतरांना काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय सुमारे पंचेवीस वर्षापूर्वी समाजातील काही धुरीनानी घेतला होता. त्या निर्णयाची अमलबजावणी आजचे तरुण हे समाजातील ज्येष्टांच्या सल्ल्याने करताना दिसत आहेत.
  जयंतीच्या निमित्ताने वक्तृत्त्व स्पर्धा,भिम गितांचा कार्यक्रम,रांगोळी स्पर्धा,या सामाजिक उपक्रमाबरोबरच अन्नदानाचा विधायक कार्यक्रमही राबवला जातो.जयंतिदिनी शोभायात्रा वगळून सकाळी भिम,व बुद्ध वंदना केली जाते.त्यानंतर सामाजिक जांनीवेतून समाजातील पुढारलेले लोक बुद्ध विहार येथे एयकत्रित येऊन समाजातील शैक्षणिक,आर्थिक या समस्याबरोबरच विस्थापित कुटुंबाच्या अडचनिवर चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न यावेळी केला जातो.महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजाचे प्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्नच खरी जयंती ठरू शकते या विचारधारेला अनुसरून पांगरीत वाटचाल केली जाते.
       सामाजिक तेढ वाढून त्यातून समाजघातक कृत्य होऊ नये,जातीय कटुता वाढीस लागणार नाही,याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जातो.पांगरीचा आदर्श घेऊन वर्गांनीविणा आंबेडकर जयंती साजरी करण्याचा आदर्श समोर ठेवुन तशी कृती करणे गरजेचे आहे.भविष्यात अवास्त खर्च आदि बाबी टाळून समाजातील तरुणांना घडवण्यासाठी जमा होणार्‍या पैशातून स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके खरेदी करून ती बौद्ध विहारात ठेवण्याचा माणसं असल्याचे सांगितले.
जयंतीच्या निमित्ताने रस्त्यावर वाहने आडवून,खंडणीसारखे मोठ मोठे गुन्हे दाखल होऊन त्यातून समाजात दरी पडण्याच्या  घटना घडलेल्या असताना पांगारीची आंबेडकर जयंती मात्र  समाजाला आशेचा किरण ठरू पहात आहे. कुंडलिक गायकवाड व दत्तू आण्णा शिंगाडे यांनी ह्या परंपरेचा पाया अनेक वर्षापूर्वी घातल्याचे अनेकांनी सांगितले.
 
Top