उस्मानाबाद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत तुळजापूर तालुका स्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            तुळजापूर तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार के. एच. पाटील, सदस्य पंचायत समितीचे सभापती मनिषा पाटील, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य महेंद्र धुरगुडे, गट विकास अधिकारी व्ही. के. खिल्लारे, सहायक सरकारी वकील सौ.अॅड ए. जी. कोकाटे, तालुक्यातील  पोलीस ठाण्याचे प्रमुख डी. एन. मुंडे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेखचे श्री. सोनार, नगर भुमापण अधिकारी  पी. यु. गायकवाड, यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी पंकज शहाणे, राजकुमार गायकवाड, रविंद्र इंगळे, पत्रकार यांचे प्रतिनिधी  श्रीकांत कदम व गोविंद खुर्द तर मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे पॅनेलवरील एक वकील अॅड एस. पी. चव्हाण यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. 

 
Top