उस्‍मानाबाद - येथील श्रीपतराव भोसले हायस्‍कुल मधील सहशिक्षक निकम कुमार गोविंद यांची महाराष्‍ट्र राज्‍य गणित अध्‍यापक महामंडळाच्‍या सुलाखे हायस्‍कुल बार्शी येथे झालेल्‍या त्रैवार्षिक निवडणुक 2015 मध्‍ये महाराष्‍ट्र राजय गणित अध्‍यापक महामंडळाच्‍या राज्‍य सहसचिवपदी बिनविरोध निवड झाली. अतिशय प्रतिष्‍ठेता मानल्‍या गेलेल्‍या या निवडणुकीमध्‍ये निकम हे बिनविरोध निवड झालेले एकमेव उ
मेदवार आहेत.
    त्‍यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष सुधीर पाटील यांनी सत्‍कार केला. यावेळी भोसले हायस्‍कुलचे प्रभारी प्राचार्य एस.एस. पडवळ, जिल्‍हा गणित अध्‍यापक मंडळाचे जिल्‍हाध्‍यक्ष ए.व्‍ही. सुरवसे, एस.बी. कोळी, वाय.के. इंगळे, एस.डी. देशमुख यांनी अभिनंदन केले. यावेळी तुकारात शेटे, धनंजय देशमुख, निखील गोरे, रामेश्‍वर बोबडे, प्रदिप गोरे, शरद क्षिरसागर, आंबादास माडे हे उपस्थित होते. 
(छाया - अजिंक्‍य माने)

 
Top