सोलापूर :-  महाराष्ट्र विधी अधिनियम 1984 च्या नियम (1) च्या खंड (क) मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीनुसार सद्यस्थितीत जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सर्व सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
      त्यामूळे सध्‍या कार्यरत असलेले जे विधी अधिकारी नियुक्तीच्या दिनांकास 60 वर्षाहून अधिक वयाचे नसतील ते जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सर्व सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावरील नियुक्तीसाठी दिनांक   15 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करु शकतील म्हणजेच वरिल सर्व पदासाठी येत्या बुधवार     दि. 15 एप्रिल 2015 पर्यंत संबंधितांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकान्वये केले आहे. 

 
Top