उस्मानाबाद -  राज्य निवडणूक आयोगाने 24 मार्च  रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक  लढविणा-या उमेदवारांनी  जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
   राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोट निवडणूकीकरीता नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर हा  किंवा त्यापुर्वीचा असेल मात्र जिने नामनर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूवी आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केला असेल, परंतु जिला नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशी व्यक्ती नामनिर्देशनपत्रासोबत- वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तीने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्‍यप्रत किंवा पडताळणी समितीकडे तीने असा कर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि  ती  निवडणून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील, याबदलचे हमीपत्र सादर करील.
परंतु आणखी असे की, त्या व्यक्तीने ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्यास, तिची निवड भूतलक्षी प्रभावाने रदद झाली असल्याचे मानण्यात येईल  आणि ती सदस्य राहण्यास निरह ठरेल. 
सदर सुधारणा 31 डिसेंबर-2015 पर्यंत होणा-या निवडणूकीसाठी लागू राहील, याची संबधितांनी नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 
Top