उस्‍मानाबाद - शिवसेना महिलांच्‍या पाठीशी खंबीरपणे असून महिलांना
न्‍याय देण्‍यासाठी महिला आघाडी आवाज उठवून न्‍याय देण्‍याचे काम करणार असल्‍याचे महिला शाखेच्‍या उदघाटन प्रसंगी जि.प. सदस्‍या सुषमा देशमुख सांगितले.
      पोहनेर ता. उस्‍मानाबाद येथे महिला शिवसेना शाखेचे उदघाटन जि.प. सदस्‍या सुषमा देशमुख यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.यावेळी  महिला आघाडी तालुका प्रमुख श्रीमती शोभा तोवर, नगरसेविका प्रेमा पाटील यांची प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थिती होती. याप्रसंगी पोहनेर महिला शाखा प्रमुख म्‍हणून श्रीमती बशिरा शेख, उपशाखाप्रमुख म्‍हणून श्रीमती शशिकला धावरे यांची निवड करण्‍यात आली.  (छाया - अजिंक्‍य माने)

 
Top