बार्शी - तालुक्यातील भोईंजे येथील इश्‍वरी विनोद पिंगळे (वय ६ महिने) या नवजात मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती बार्शी पोलिसांनी दिली. येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे नवजात मुलीसह तिची आई उपचारासाठी दाखल झाली यातील मुलीचा मृत्यू दि.३ रोजी सकाळी ७ पूर्वीच झाला असून तिच्या आईवर उपचार सुरु आहेत. सध्या ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने सदरच्या घटनेबाबत पोलिसांकडून माहिती उपलब्ध नाही. नवजात मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण काय, तसेच आई व मुलीवर कोणता प्रसंग आल्याने सदरची घटना घडली याचा शोध पोलिस घेत आहेत.

 
Top