उस्मानाबाद -  केंद्र शासनाने सेवा योजन कार्यालयाने सक्तीने पदे अधिसूचित करण्यास भाग पाडणे, कायदा 1959 त्यांतर्गत निमयमावली 1960 पारीत केले आहे. सदरील कायद्याच्या कलम 5 अन्वये सर्व सबंधित उद्योजकांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती दर तिमाहीस  विहीत प्रपत्र ई आर-1 मध्ये या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. 
कायद्यातील नियम 6 च्या पोटनियम 3 मध्ये निर्धारित करण्यात आलेले आहे की, तिमाही विहित प्रपत्र ई आर-1 च्या प्रयोजनार्थ प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च, 30 जुन,30 सप्टेंबर व 31 डिसेंबर या विहित तारखा असतील व विहीत प्रपत्र या विहित तारखापासून एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व केंद्र -राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या खाजगी आस्थपनेत 10 किंवा अधिक मनुष्यबळ आहे अशा आस्थापनांनी 30 मार्च अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक रमेश पवार यांनी कळविले आहे.
सेवा योजन कार्यालये ( रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) अधिनियम 1959 कलम ७ (2) अन्वये विवरणपत्र न पाठविणाऱ्या आस्थापनास कसुरदार समजून त्याचेविरुध्द न्यायालयीन अभियोग दाखल केला जाईल. सदरील विवरणपत्र उद्योजकांना एम्पलायर याना ऑनलाईन सादर करता यावे, यासाठी  रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या http://www.maharojgar.gov.in  हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. 
सदरील वेबपोर्टलव्दारे आपण दि.31 मार्च, 2015  अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई आार-1, दि. 30 एप्रिलपर्यंत आपला युजर आयडी व पासवर्ड  वापरुन ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.या संकेतस्थळावरही विवरणपत्र ऑनलाईन पाठविण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती  रमेश पवार यांनी दिली.                 
 
Top