उस्मानाबाद -  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस चार लाखाहून अधिक भाविकांनी श्री तुळजाभवानी चे वाजत गाजत दर्शन घेतले. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आढावा बैठक घेऊन यात्रा योग्य पार पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यात्रा कालावधीत मंदीर परिसरात मंदीर, पोलीस, आरोग्य, एस.टी.परिवहन महामंडळ, नगर पालिका यांनी केलेल्या जय्यती तयारीमुळे यात्रेकरुमध्ये नवीन उत्साह निर्माण होत आहे. मंदीर परिसरात  आनंदाचे वातावरण असून चोहीकडे विद्यूत रोषनाई करण्यात आली आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेशातील भाविकांची संख्या मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. 
             तुळजापूर शहरातील रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसून येत असून आई राजा उदो उदो च्या जयघोषांनी नगरी दुमदुमून गेली आहे. या ठिकाणचे वातावरण भक्तीमय झाले आहे. देवीभक्तांनी मोठया प्रमाणात कपाळी मळवट आणि देवीजीस भोगी नैवैद्य,माळ, परडी घेणे दंडावत घेणेयांच्यासह धार्मीक विधी मनोभावे केले. 
            चैत्री पोर्णिमा यात्रेसाठी येणाऱ्या देवीभक्तांना कुठल्याही प्रकारची गेरसोय होऊ नये, यासाठी मंदीर प्रशासन चोख व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस बदोबस्तांसाठी 224 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र,मंदीराजवळ 2 अम्बुलन्स, दिवसातून 2 वेळेस पाणी तपासणी, या कामासाठी 45 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियक्ती करण्यात आली होती. 
        नगर पालिका प्रशासनाकडून   16 पाणपोई, 4 प्रथमोपचार केंद्र, ठिकठिकाणी जिगजाग पध्दतीची बॅरेगेटींग, स्वच्छतेसंदर्भात 3 पाळीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अनाधिकृत वाहनाकरिता टोईंगची व्यवस्था, जंतुनाशक फवारणी, सावलीसाठी 3 निवारे, स्वागत कमानी, अतिक्रमण पथक 24 तास कार्यरत, पाणी पुरवठयांची चांगली व्यवस्था करण्यात आली होती.  तर एस.टी.महामंडळाकडून उस्मानाबाद डेपोच्या 52 गाडया,सोलापूर-10,बीड व लातूर प्रत्येकी 15 गाडया, 4 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यातआले होते. यात्रेच्या पुढील नियोजनासाठी  150 ते 175 गाडयाचे नियोजन करण्यात आले आहे. 2 टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच ठिकठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. कंट्रोल रुमच्या ठिकाणी सतत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 
Top