उस्मानाबाद -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत भूम तालुका स्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य सचिव अभिषेक त्रिमुखे यांनी  कळविले आहे.
            भूम तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार अरविंद बोळंगे, सदस्य पंचायत समितीचे सभापती अण्णासाहेब भोगील, तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय मोहीते, गट विकास अधिकारी टी.बी. उगलमुगले, सहायक सरकारी वकील डी.टी. वायबसे, तालुक्यातील  पोलीस ठाण्याचे प्रमुख रणजित सावंत, तालुका निरीक्षक भूमी अभिलेखचे पांडुरंग सानप, नगर भुमापण अधिकारी,  गणेश जगदाळे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अरुण गाढवे, सॉ.अॅड. अमृता गाढवे, पत्रकार यांचे प्रतिनिधी अरुण देशमुख, प्रमोद कांबळे  तर मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे पॅनेलवरील एक वकील ॲड विलास पवार यांचीही सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.   
 
Top